चिमुकल्यासह महिलेची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या

Foto
पोलिसांकडून महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर २५ ते २७ वर्षीय अनोळखी महिलेने आपल्या दीड वर्षाच्या चिमुकल्यासह धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेत माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे मृत महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, ही महिला रेल्वे येण्यापूर्वी बराच वेळ प्लॅटफॉर्मवर बसलेली होती
हातावर अक्षय गोंदलेले
▶ मृत महिलेच्या हातावर अक्षय हे नाव आणि शेजारी हृदयाचे चित्र गोंदलेले आहे. तिच्याकडे बॅग किंवा कोणतीही ओळख पटवणारी वस्तू आढळली नाही. या नावाच्या आणि हातावरील खुणांच्या आधारे पोलिस नातेवाइकांचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलिस अंमलदार विजयसिंह लखवाल करत आहेत.
आणि मुलगा तिच्याजवळ खेळत होता. छत्रपती संभाजीनगर स्थानकावरून आलेली तपोवन एक्स्प्रेस जालन्याच्या दिशेने जात असताना, मुकुंदवाडी
स्थानकावर थांबा नसल्याने तिचा वेग अधिक होता. रेल्वेस्थानकात येताच या महिलेने बाळासह धावत्या ट्रेनसमोर उडी घेतली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह घाटी रुग्णालयात रवाना केले. घटनेनंतर रुळावर पडलेला चिमुकल्याचा बूट, कपडे आणि काही अंतरावर पडलेल्या महिलेची चप्पल पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions